Sunday 17 March 2013

Pages from Diary - 11

गौरी च्या कथेमध्ये कशी कुणास ठावूक..पण मला मीच सापडून जाते..
नमू खूपशी माझ्यासारखी आहे..(का मी तिच्यासारखी आहे)..बाकी इतर गोष्टी वेगळ्या असोत..पण एक माणूस म्हणून किंवा एक बाईपण म्हणून ही मला नमू जवळची वाटते..
तिची कथा वाचताना मला कसा कुणास ठावून माझ्यातला साधेपणा परत सापडत गेला...
आणि तिचा विलक्षण निरागसपणा अगदी जवळचा वाटला..
तिचं बुजर्या स्वभावात मला मीच दिसले..
(हे लिखाण गौरीच्या कथेबद्दल नाहीच.. तिच्या पात्रांबद्दल ही नाही..
माझ्याबद्दल आहे.. गौरी वाचताना मला नव्याने जाणवलेल्या माझ्याबद्दल..)
तिच्या गोष्टींमधलं  प्रेम हि मोठ विलक्षण असत..
अगदी खोल खोल जाणार्या, अथांग डोहासारख..अयोनियानासारख..
गूढ..हिरवं-निळ..तरीही नितळ पाण्यासारखं!!!
शब्दही सुंदर..नेमके आणि नेटके..
कुठेही मखमलीपणा नाही..अघळ-पघळ नाही..
तरीही वाचत राहावं आणि डोळ्यांनाच नव्हे तर हृदयालाही भिडून जाव अस लिहिण...

कालिंदी बद्दल परत कधीतरी!!